वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

पुसदेकर परिवारातर्फे वातानुकूलित शवपेटी रोटरी क्लब ला समर्पित

पुसदेकर परिवारातर्फे वातानुकूलित शवपेटी रोटरी क्लब ला समर्पित 

चेतन लूतडे वरोरा 
१/६/२२

हितेंद्र व गजूभाऊ पूसदेकर यांच्या आई स्व.अंजनाबाई गुलाबराव पुसदेकर ह्यांचे स्मृतिप्रित्यर्थ मोठे बंधू ग्रुप कॅप्टन हितेंद्र जी.पुसदेकर (भारतीय वायुसेना ) व परिवार,विद्यानगरी,वरोरा तर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रोटरी क्लब वरोरा ह्यांना वातानुकुलीत शवपेटी गरजू शोकाकुल परिवार ह्यांना वेळेवर उपलब्ध करून देन्यासाठी आज 1 जुन 2022 ला समर्पित करण्यात आली.

यावेळी पुसदेकर परिवारातर्फे सौ पुसदेकर,व गजूभाऊ पूसदेकर यांच्या हस्ते  रोटरी क्लबचे अध्यक्ष हिरालाल बघेले , दादा जयस्वाल , होजपा अली, अदनान सिद्दि कोट, पराग पत्तीवारजी रोटरीयन्स यांच्या सुपूर्त करण्यात आली. 

Comments