1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

शासनाची वाढीव चना खरेदी तिन दिवसातच बंद

शासनाची वाढीव चना खरेदी तिन दिवसातच बंद

वरोरा
चेतन लूतडे

शासनाची वाढीव चना खरेदी साठी 18 जून शेवटची तारीख  दिली होतो. जिल्ह्यातील 50 टक्के शेतकऱ्यांचा चना खरेदी बाकी असतानाच शासनाचे उद्दिष्ट पुर्ती पूर्ण झाल्यामुळे इंटरनेट वरील वेबसाईट बंद झाल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे जिल्ह्यातील बरेच शेतकरी आल्या पावलाने घरी वापस जात आहे. जिल्ह्यातील नेतृत्व शेतकऱ्यांसाठी कमी पडत असुन पावसाळ्यापूर्वीच चण्याची खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचा चना घरीच सडण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.
त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

Comments