गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

कला शाखेतील विद्यार्थिनी तालुक्यात प्रथम आल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आले.

कला शाखेतील विद्यार्थिनी तालुक्यात प्रथम आल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आले.

रवि बघेल भद्रावती /२६/६/२२
 भद्रावती :- स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी जीनत परवीन समादखां पठाण ही 82.83 टक्के गुण घेऊन भद्रावती तालुक्यात कला शाखेतून बारावीत सर्वप्रथम आली आहे. विवेकानंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 89.85 टक्के लागला आहे. ती आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, प्रा. रामकृष्ण मालेकर, प्रा. भोजराज कापगते, प्रा. नरेंद्र लांबट व आपल्या आई-वडिलांना देते. तिच्या या  यशाबद्दल मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आले यावेळी डॉ  शकील , शाहिद कुरेशी, शेख रब्बानी, रियाज अन्वर शेख, जावेद शेख उपस्थित होते.

Comments