वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा तहसील कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याने पुरुषांसोबत महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

वरोरा तहसील कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याने पुरुषांसोबत महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

मनसेचे प्रशांत झुंजारे यांचे निवेदन

वरोरा २३/६/२३
चेतन लूतडे 

वरोरा तहसील कार्यालय येथे स्वच्छता गृह बांधावे या करिता मनसेने आक्रमक बनली असून यासंदर्भात वरोरा तहसील कार्यालयात  निवेदन सादर करण्यात आले.
वरोरा शहरात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तालुक्यातील खेड्यातून व शहरातून महिला व पुरुष तहसील मधील संबंधित कामे करण्यासाठी कार्यालयात येतात.अशा रहदारिच्या ठिकाणी महिला व पुरुष वर्गा करिता स्वच्छता गृहाची व्यवस्था बऱ्याच वर्षापासून केली नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 ही वरोरा शहराकरीता शोकांतिका असून, गेल्या कित्येक वर्षापासून स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारले गेले नाही. कामाकरता आलेले पुरुष तहसील कार्यालयाच्या चारही बाजूला लघुसंकेसाठी जातानी दिसतात. परंतु महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत झुंजारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली.
यानंतर लगेच संबंधित अधिकाऱ्याने या निवेदनावर दखल घेत लवकरच परिसरात स्वच्छतागृहांची निर्मिती करून देण्याचे आश्वासन दिले.
 यावेळी मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे सह गौरव मेले , आनंद गेडाम,आकाश काकड़े,सत्या मांडवकर,हर्षल डोंगरे, शाहिद शेख,सचिन गाते, साहील झीले, आदि मनसैनिक उपस्थित होते
            

Comments