वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

इंटक (असंघटित ) काँग्रेसची कार्यकारणी जाहीर

इंटक (असंघटित ) काँग्रेसची कार्यकारणी जाहीर 

खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार 

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आहेत. परंतु त्यामध्ये काम करीत असलेल्या कामगारांचे अधिकार व कर्तव्य त्यांना माहित नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या असंघटित कामगारांचे प्रश्न इंटक (असंघटित ) काँग्रेस मार्गी लावण्यात कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 

वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात चंद्रपूर इंटक काँग्रेस पदाधिकारी पदग्रहण सोहळा साठी 
 आमदार प्रतिभाताई धानोरकर, विदर्भ इंटक अध्यक्ष अर्चनाताई भोमले, कामगार नेते  पांडेजी, वरोरा कृषी सभापती चिकटे, अनिकेत अग्रवाल जिल्हाध्यक्ष इंटक  ( असंघटित ) काँग्रेस चंद्रपूर , माजी चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी  चंद्रपूर शहर अध्यक्ष पदी मनोज मतकुलवार, चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदी विजयभाऊ  धोबे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष पदी सुरेश दूधगवळी, राजुरा तालुका अध्यक्ष पदी अक्षय डाखरे, कोरपना तालुका अध्यक्ष आशिष नामवाळे,  जिल्हा सचिव पदी निखिल येलमुले, जिल्हा महासचिव पदी गजानन  नागपूरे यांना पदे देण्यात आली. यावेळी पदाधिकारी व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.

Comments