लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती थांबली.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती थांबवण्यात आली असून यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार आणि भद्रावती वरोरा विधानसभेचे आमदार यांनी याआधी झालेल्या नोकर भरती दरम्यान आर्थिक व्यवहार झाल्याची बाब समोर आणली होती. 

राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ३६० पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली होती. परंतु याआधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे ही नोकरभरती होऊ नये, यासाठी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर  यांनी लोकसभेत तर त्यांच्या पत्नीवरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडले होते .

बॅंकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बॅंकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देऊन या घोटाळ्यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उचलून धरली होती. आता विशेष कार्यकारी अधिकारी व सहनिबंधक महाराष्ट्र शासन यांनी या भरतीला स्थगिती दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीसोबतच गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील बँकांचा देखील समावेश आहे. धानोरकर दाम्पत्याने नोकर भरती थांबवून घोटाळा करणारे सदस्य व अधिकारी वर्गातील लोकांच्या मुसक्या आवळल्या आहे.


Comments