वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

महामार्गावरील आनंदवन चौक व कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी.


महामार्गावरील आनंदवन चौक व कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल लावा
 
वरोरा:6/5/22
विलास टिपले

       शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या चंद्रपूर नागपूर दुतर्फा महामार्गावरील अब्दुल कलाम ( रत्नमाला) चौक व आनंदवन चौकात  मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी होत आहे.
          वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी याबाबत महसुल व पोलीस प्रशासनास निवेदन देऊन या महामार्गावर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी केली आहे.
                    अब्दुल कलाम( रत्नमाला) चौकात शहरातून उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक,बोर्डा गावाकडून येणारी वाहतूक व सर्विस रोडवरील वाहतुकीने या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यास वाहतूक पोलिसांनाही त्रासदायक होत आहे.आनंदवन चौकातही चिमूर रस्त्याकडून येणारी वाहतूक व वरोरा शहरातून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. आनंदवन चौक ते बोर्डा चौक परिसरात आजतागत अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यांच्या दुतर्फा वसाहती झाल्या असून अनेक शाळा, महाविद्यालये, दवाखाने , हॉटेल्स, व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. 
         दिवसेंदिवस या चौकात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असून या चौकामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे ,मुख्याधिकारी गजानन भोयर यांचेशी चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम ,मनोहर स्वामी,सलीम पटेल आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी आहे.

Comments