लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

एअरबॉर्न ट्रेनिंग स्कूलचे विद्यार्थी नेपाळ येथील होनाऱ्या कराटे स्पर्धेमध्ये भाग घेणार.

एअरबॉर्न ट्रेनिंग स्कूलचे विद्यार्थी नेपाळ येथील होनाऱ्या कराटे स्पर्धेमध्ये भाग घेणार.

वरोरा २०/५/२२
चेतन लूतडे

इंटरनॅशनल ट्रेडिशन शितो-रियू आणि कुबूडू काई असो. इंडीया यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन नेपाळ येथील काठमांडू शहरात करण्यात आले आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी भारतातील वेगवेगळ्या शहरातून निवड स्पर्धकांची निवड केली जाते.
त्यासाठी असोसिएशन सोबत संलग्नित असणाऱ्या संस्थांना याचा मान दिला जातो.
यावर्षी प्रथमच वरोरा शहरातील एअरबोन ट्रेनिंग स्कूल मधील अकरा विद्यार्थ्यांचा समावेश या निवड चाचणीत करण्यात आला आहे. 
त्यासाठी वरोरा शहरातून निवड झालेल्या अकरा विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांचे मार्गदर्शक गुरु रवी चरूरकर व संस्थेचे अध्यक्ष सागर कोहळे ,प्रवीण चीमुरकर, रवी तुरानकर यांनी केले आहे. 

या विद्यार्थ्यांसाठी लागणारे अर्थसहाय्य संस्थेशी संलग्न असणाऱ्या मान्यवरांनी व गांधी उद्यान योग मंडळांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलांची नावे खालील प्रमाणे आहे.
१)यश देविदास नरडे वय १५
२)यथार्थ प्रदीप नंदनवार वय १३
३)पियुष गजानन विधाने वय १३
४)सोनू रूपचंद निकोडे वय १४
५)अश्विनी गजानन नरड वय २३
६)दिव्या प्रदीप नंदनवार वय १९
७)निर्गुणा जगदीश पेंदोर वय १६
८)सानिया राजू आवारी वय १३
९)साक्षी शंकर पर्बत वय १७
१०)दुर्वाक्षी रवी भुजाडे वय १४
११)पायल नरेंद्र येरने वय १८
१२) ईशा एकनाथ वरभे वय १६

वरील विद्यार्थ्यांची निवड काठमांडू येथे होणाऱ्या कराटे स्पर्धे दरम्यान झाली असून येत्या २४ ते २८ तारखेला काठमांडू येथे ही स्पर्धा होत असून या स्पर्धका सोबत त्यांचे कोच रवी चरूरकर  विद्यार्थ्यांसोबत जाणार आहे.

Comments