लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

लोक शिक्षण संस्थेच्या परिसरात उन्हाळी शिबिराचे आयोजन

लोक शिक्षण संस्थेच्या परिसरात उन्हाळी शिबिराचे आयोजन
 वरोरा दिनांक 27 एप्रिल22
प्रशांत खूळे वरोरा


        लोकशिक्षण संस्था वरोरा च्या वतीने विविध खेळ, कला आणि घोष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन लोक शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे .

 दरवर्षी या उन्हाळी शिबिराला मुलांचा मोठा सहभाग असतो. यावर्षी 2 मे ते 14 मे दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेस हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यात कबड्डी ,हॉलीबॉल, योगा, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. संस्कृत संभाषण आणि विज्ञान शोध प्रकल्प शिबिर याचेही आयोजन याच दरम्यान केले गेले आहे. कला शिबिर घोष प्रशिक्षण शिबिर आणि गायन ,तबला आणि हार्मोनियम प्रशिक्षण शिबिराचा ही समावेश यात करण्यात आला आहे.


      या शिबिरादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहे . शारीरिक क्षमता,  आहार विषयक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, उच्चार शुद्धतेसाठी संस्कृत स्त्रोत पठाण आणि वैज्ञानिक संशोधन वृत्ती वर या शिबिरात भर राहणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
 इच्छुकांनी 
प्रा उत्तम  देऊळकर  (94 23  61 03 6 3 )
अनिल  घुबडे ( 94 20 30 20 36)  आणि सारंग धनेगावकर (98 23 89 51 11)  यांचेशी संपर्क करावा असे कळविले आहे

Comments