लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा येथे मवीआ सरकार विरोधात लोडशेडिंग संदर्भात कंदील आंदोलन

*वरोरा येथे मवीआ सरकार विरोधात लोडशेडिंग संदर्भात कंदील आंदोलन*  

         मविआ सरकारच्या नाकर्तेपणा मुळे राज्यावर ओढलेल्या लोडशेडिंगच्या विरोधात भारतीय जनता पार्टी वरोराच्या वतिने श्री.अहेतेशाम अली {माजी नगराध्यक्ष-न.प.वरोरा,तथा जिल्हा सचिव भाजप} यांचा  नेतृत्वाखाली *मशाल व कंदील आंदोलन* डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,वरोरा येथे करण्यात आले. यावेळी डॉ.भगवान गायकवाड(तालुका अध्यक्ष भाजप),सुरेश महाजन(शहर अध्यक्ष भाजप),करन देवतळे(प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा),विनोद लोहकरे,दिलीप भिवदरे,सौ.संगीता निम्बाळकर,डॉ.गुणानंद दुर्गे,गजानन राउत,शरद कातोरे,प्रमोद ढवस,अमित चवले,सुराना जी,दादू खंगार,दीपक चौव्हान,आशीष देवतळे,सुनील जिलगीलवार,कुनाल नक्शिने,आदेश बावने, आशा प्रकारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments