लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भाजयुमोच्या प्रदेश महामंत्री शिवाणी दाणी आज वरोड्यात

*भाजयुमोच्या प्रदेश महामंत्री शिवाणी दाणी आज वरोड्यात
वरोडा : श्याम ठेंगडी 
27/4/22
     भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री *शिवणीताई दाणी* यांचे बुधवार २७ एप्रिलला चंद्रपुर जिल्ह्यात आगमन होत असून वरोडा शहर व ग्रामीण भाजपाच्या वतीने *आनंदवन चौक* येथे भव्य स्वागत करण्यात येणार असून यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

     आनंदवन चौकात दुपारी ३.३० वाजता होणार्‍या या कार्यक्रमात भाजपचे नेते, माजी राज्य अर्थमंत्री व महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष *सुधीर भाऊ मुनगंटीवार* तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री 
 *मा. हंसराज भैया अहीर* आणि भाजपा जिल्हाध्यक्ष 
 *देवराव दादा भोंगळे* हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 
           या कार्यक्रमाला                सर्व भाजप,भाजयुवामोर्चा व महिला आघाड़ीच्या वरोडा शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती भाजपतर्फे करण्यात आली आहे.

Comments