लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्यसेवा देणे आवश्यक

*समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्यसेवा देणे आवश्यक*

*खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते तालुका आरोग्य मेळाव्याचे उदघाटन*  
 
चंद्रपूर : सर्वसामान्य, गोरगरीब, गरजू रुग्णापर्यंत आरोग्य व्यवस्थेने पोहचून त्यांना सेवेचा लाभ देणे आवश्यक आहे. गरिबातल्या गरिबाला दर्जेदार आरोग्य सुविधा देणे यंत्रणेचे कर्तव्य असून त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पडली पाहिजे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून वरोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, तहसीलदार रोशन मकवाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र  कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा डॉ. अंकुश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी वरोरा डॉ. बाळू मुंजुनकर, पोलीस उपनिरीक्षक मडावी, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा वानखेडे, सभापती राजू चिकटे, सुभाष दांदडे रोटरी क्लब अध्यक्ष वघले यांची उपस्थिती होती.  

जिल्हा रुग्णालयासारख्या सुविधा असलेल्या ग्रामीण रुग्णालयात मेळाव्यानिमित्त विविध आजारांवर तज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याकडे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान व त्यावरील पुढील उपचार रुग्णांना मेळाव्यात होत आहे. स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ, मधुमेहतज्ञ, उच्च रक्तदाब, दुर्धर आजार, संसर्गतज्ञ, असंसर्गतज्ञ आजारांवर निदान व उपचार पद्धतीचा लाभ यावेळी मेळाव्यानिमित्य शेकडो नागरिकांनी घेतला आहे.     

त्यासोबतच विविध आजार, आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची माहिती व उपाययोजना इत्यादी कार्यक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. 

 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .  . . . .  . . . . . . . . . . . . 

*निरोगी आयुष्यासाठी आरोग्याची तपासणी गरजेचीच : आमदार प्रतिभाताई धानोरकर*

चंद्रपूर : निरोगी आयुष्यासाठी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्याकरिता आरोग्य मेळावा हा चांगला उपक्रम आहे. आरोग्य मेळाव्याचा माध्यमातून जनतेने आपल्या रोगाचे निदान करून उपचार करून घ्यावा असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

Comments