वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे युवा क्रांति सोशल क्लब ने हनुमान जयंती रँलीचे केले शरबत वाटुन स्वागत

*वरोरा येथे युवा क्रांति सोशल क्लब ने हनुमान जयंती रँलीचे केले शरबत वाटुन स्वागत*


         *वरोरा  येथील नेहरू चौक येथे हनुमान जयंती निमित्य युवा क्रांती सोशल क्लब तर्फे श्री.अहेतेशाम अली मा.नगराध्यक्ष न.प.वरोरा यांच्या नेतृत्वात  शहरात निघालेल्या मिरवणुकिमधील नागरिकांना शरबत वितरण करण्यात आले. या प्रसंगी युवा क्रांति सोशल क्लब चे अनिकेत नाकाड़े,राहुल आत्राम,निखिल श्रीरामे,अभिजित चौधरी,सन्नी रामपुरे,इश्वर ठाकरे,शफीक शेख,अमन नायडू,हाशिम अली,नितिन मानुसमारे अरुण बावने,अनिरुद्ध तेलंग,निखिल शेम्बडकर,निखिल चंदेल,प्राशिल लोखंडे,विकास बुरटकर,पराग तितरे,अराहान सिद्दीकी,आकाश गायकवाड,तसेच या पूर्वी राम नवमी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी मध्ये सुद्धा युवा क्रांति सोशल क्लब तर्फे शरबत वितरण करण्यात आले होते..!

Comments