वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

अहेतेशाम अली यांच्या हस्ते कबड्डी सामन्यांचे उदघाटन

अहेतेशाम अली यांच्या हस्ते कबड्डी सामन्यांचे उदघाटन
       
           *न्यू विद्यार्थी क्रिडा मंडळ तुळाणा, व न्यू हनुमान क्रिडा मंडळ,बांद्रा यांचा तर्फे आयोजित कबड्डी सामन्यांचे उदघाटन श्री.अहेतेशाम अली मा.नगराध्यक्ष न.प.वरोरा यांचा हस्ते करन्यात आले.

 या प्रसंगी तुळाणा येथील सरपंच-सौ. मनिषाताई ठेंगणे, उपसरपंच-दिलीप उपरे,सौ.मनिषाताई गंधारे,ग्राम पंचायत सदस्या,राजुभाऊ असेकर,शितलताई टोंगे,शरद कुईटे,नथू कष्टी,गेडाम सर,विवेक मंगाम,त्रिशूल गंधारे,आशीष निखाडे,रमेश उमरे तसेच बांद्रा येथील ग्रा.पं.बोरगाव सरपंच-सौ.जयाताई चिंचोलकर,अविनाश चिंचोलकर पोलिस पाटिल बांद्रा,श्री.नागोजी दोहतळे,सौ.वर्षाताई राणे,अमोल नक्षिने, विशाल खांडेकर सोबतच गावातील नागरीक  या सर्वांचा उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला..!

Comments