वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

माजी.न.प. अध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते शिवजयंती निमित्य वरोरा शहरात विविध उपक्रम व कार्यक्रम

माजी.न.प. अध्यक्ष अहेतेशाम अली यांचा हस्ते शिवजयंती निमित्य वरोरा शहरात विविध उपक्रम व कार्यक्रम*

    आज दि.१९ फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वरोरा शहरात मोठ्या थाटा माटात उत्साहात साजरी करत  श्री.अहेतेशाम अली{मा.नगराध्यक्ष न.प.} यांच्या हस्ते युवा क्रांती सोशल क्लब तर्फे सर्वप्रथम शिवाजी चौक येथे राजे  श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.या नंतर ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे महाराजांचा प्रतितिमेला माल्यार्पण करून रुग्नांचा तब्बेतिची विचारणा केली आणी फळ वाटप केले.या प्रसंगी ग्रूप चे अनिकेत नाकडे,राहुल आत्राम,निखिल श्रीरामे,नितेश मनुसमारे,प्रशित लोखंडे,आयुष मधुमटके,पराग तितरे,ईश्वर ठाकरे,सन्नी रामपुरे,अमन नायडू,वसंता गेडाम,आकाश धरने,दीपक लडी,शफीक शेख,निखिल चंदेल,अक्षय टेनपे,हाशिम अली,अनिकेत दातारकर,राजिक शेख,सतीश अड्डे,विकास बुरडकर,प्रथम बुरडकर,अभिजित चौधरी,अरहान सिद्दीकी,अरुण बावने,प्रतीक मुड़े,आकाश गायकवाड उपस्थित होते. ..!  
        तसेच छावा ग्रूप तर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी रक्तदान शिबिरचे उदघाटन श्री.अहेतेशाम अली यांचा हस्ते करण्यात आले या प्रसंगी सर्वानी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली.या प्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समिति सभापती-राजुभाऊ चिकते,बोर्डा येथील सरपंच-सौ.ऐश्वर्याताई खामनकर,ग्रामपंचायत सदस्य-सौ.भोयर म्याँडम सुधाकर कुंकुले,आकाश लिगाडे,राहुल नन्नावरे,निहाल मत्ते,समीर देठे,मंगेश पिजदुरकर,अमित नन्नावरे,अनिमेश रेड्डी,कपिल राऊत या सर्वांच्या उपस्थितीत शिवजयंती मोहत्सव साजरा करण्यात आला..!

Comments