वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

चंद्रपूर नागपूर महामार्गावरील अपघात

दोन दुचाकी ची टक्कर एक ठार,एक जखमी

चेतन लूतडे

वरोरा:---चंद्रपूर नागपूर महामार्गावर असलेल्या एकर्जुना पाटीवर दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात मधुकर कवडुजी राऊत रा,जुगमाई, ब्रम्हपुरी, याचा मृत्यू झाला तर अथर्व मधमशेट्टीवर वय 21 ,शशांक सिंग हे जखमी झाले ही घटना आज दि 2फेब्रुवारी ला दुपारी साडेतीन वाजता सुमारास घडली,मृतक आपल्या गाडी क्रमांकMH31R4318 याने  एकर्जुना येथे चालू असलेल्या मिस्त्री कामावर जात असताना रास्ता ओलांडताना ऍक्टिवा क्रमांक MH29BU8834 ला धडक दिली त्यात ऍक्टिव्हा चालक गंभीर जखमी झाले पोलीस कर्मचारी मल्ले वार प्राथमिक तपस करीत आहे

Comments