वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी वरोर्यात मनसे आक्रमक, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एकोना-  मार्डा कोळसा खाण क्षेत्रात मनसेचे आंदोलन

स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी चंद्रपुरात मनसे आक्रमक, 
Warora 
Chetan lutade

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एकोना-  मार्डा कोळसा खाण क्षेत्रात मनसेचे आंदोलन, गेले वर्षभर शासन व लोकप्रतिनिधींना स्थानिकांच्या रोजगाराचा बाबत केला जातोय पाठपुरावा, मात्र खोदकामाची परवानगी मिळालेल्या खाजगी कंपनीने चालवली आहे मनमानी, या मनमानी विरोधात स्थानिकांच्या आंदोलनात मनसेचा पुढाकार, स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, मनसेच्या आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

-स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी चंद्रपुरात मनसे आक्रमक झाली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एकोना-  मार्डा कोळसा खाण क्षेत्रात आज मनसेने आंदोलन केले. गेले वर्षभर इथल्या प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधींना पाठपुरावा केला जात आहे.  मात्र खोदकामाची परवानगी मिळालेल्या खाजगी कंपनीने भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खाजगी कंपनीने चालवलेल्या मनमानी विरोधात मनसेने स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.  मनसेच्या आंदोलन स्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Comments