वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

About Us

faktbatmi.com 



faktbatmi.com ही एक विश्वासार्ह मराठी न्यूज प्लॅटफॉर्म असून याची सुरुवात सन 2020 मध्ये Warora आणि Bhadrawati येथून Chetan Lutade यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक बातम्यांपासून सुरुवात करून आज FaktBatmi ने आपला विस्तार संपूर्ण Vidarbha प्रदेशात तसेच Maharashtra राज्यातील काही भागांपर्यंत केला आहे.
विश्वसनीय, जलद आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. समाजातील घडामोडी, राजकारण, शिक्षण, उद्योग, कृषी, सामाजिक विषय आणि स्थानिक प्रश्न यांवर आम्ही सतत प्रकाश टाकत असतो. डिजिटल माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनणे आणि सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेच FaktBatmi चे ध्येय आणि वचन आहे

Comments