वरोरा–रत्नमाला रस्त्यावर नव्या काँक्रीट रस्त्याला तडे; मोठमोठे खड्डे पडल्याने संताप.कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुयोग भोयर यांचा सवाल?

वरोरा–रत्नमाला रस्त्यावर नव्या काँक्रीट रस्त्याला तडे; मोठमोठे खड्डे पडल्याने संताप.


कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुयोग भोयर यांचा सवाल?

वरोरा : वरोरा–रत्नमाला परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याची काही दिवसांतच दुरवस्था झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी तडे जाऊन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नव्याने बांधलेल्या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्ता तयार केल्यानंतर काही कालावधीतच तो खराब होत असल्याने संबंधित यंत्रणेने याची तातडीने पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, “रस्ता बनवला की अपघातांना निमंत्रण दिलं?” असा सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुयोग पुरुषोत्तम भोयर यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारा प्रकार सहन केला जाणार नाही. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

“एकजूट होऊया… टोलच्या झोलला जाब विचारूया!” असे आवाहनही सुयोग भोयर यांनी केले आहे. रस्त्याची गुणवत्ता, बांधकामाचा दर्जा आणि देखभालीची जबाबदारी याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

...........

जाहिरात

आमदार करण देवतळे यांच्या घरी श्री गणपतीचे आगमन 

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या घरी श्री गणपतीचे भव्य आगमन. 

..............................

Comments