लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

आनंदवन चौक-रत्नमाला चौकात वाहतूक सिग्नल कधी बसणार? आनंदवन चौक ते बोर्डा चौक स्ट्रीट लाईट बदलण्याची नागरिकांची मागणी.

आनंदवन चौक-रत्नमाला चौकात वाहतूक सिग्नल कधी बसणार? आनंदवन चौक ते बोर्डा चौक स्ट्रीट लाईट बदलण्याची नागरिकांची मागणी.

रस्ता दुरुस्तीमुळे वाहतुकीची कोंडी, खड्डे, अपुरा प्रकाश आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप

वरोरा | दि. ५ जुलै २०२६/चेतन लूतडे 

वरोरा शहरातील देशपांडे पेट्रोल पंप ते बोर्डा चौक या  महामार्गावरील रस्ताचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. या कामामुळे नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून वाहनचालक आणि नागरिकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण रस्ता, खड्डे, वाहतुकीची कोंडी आणि अपुरा प्रकाश यामुळे या मार्गावरील अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका ऑटोचा खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढी गंभीर घटना घडूनही संबंधित यंत्रणेकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
रात्रीच्या वेळी या मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद असतात, तर सुरू असलेल्या दिव्यांचाही प्रकाश रस्त्यावर पुरेशा प्रमाणात पडत नसल्याची तक्रार आहे. कमी क्षमतेचे दिवे बसविण्यात आल्याने पावसाळ्यात दृश्यमानता आणखी कमी होते. परिणामी भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना खड्डे आणि सुरू असलेले काम वेळेत दिसत नाही, जनावरे रोडवर बसून असतात  त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
सध्या पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वार आणि ऑटोचालकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. नागरिकांनी तातडीने खड्डे बुजविणे, आवश्यक त्या ठिकाणी इशारा फलक, बॅरिकेड्स आणि रात्री परावर्तित होणारे सुरक्षा चिन्ह लावण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांनी आनंदवन चौक आणि रत्नमाला चौक येथे वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही या दोन्ही चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे चौकांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होत असून भरधाव वाहने थेट काम सुरू असलेल्या भागात येऊन धडकण्याच्या घटना घडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आनंदवन चौक आणि रत्नमाला चौक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असले तरी वाढत्या वाहनसंख्येमुळे तेही अपुरे पडत आहेत. पावसाळ्यात ही समस्या आणखी तीव्र होत असून नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक बंडू देऊळकर यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. आनंदवन चौक व रत्नमाला चौक येथे तातडीने वाहतूक सिग्नल बसविणे, आनंदवन चौक ते बोर्डा चौक या मार्गावरील निकृष्ट व अपुऱ्या क्षमतेचे स्ट्रीट लाईट बदलून उच्च क्षमतेचे एलईडी दिवे बसविणे, अतिक्रमण हटविणे आणि रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर परिषद आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
.............
पत्रकार बंधूनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार करण देवतळे यांना शुभेच्छा दिल्या.

Comments