वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

अपघातग्रस्त कारमध्ये २.३२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखलनागपूर–चंद्रपूर महामार्गावरील मागली फाट्याजवळ कार सोडून चालक फरार; महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ) अंतर्गत कारवाई


अपघातग्रस्त कारमध्ये २.३२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील मागली फाट्याजवळ कार सोडून चालक फरार; महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(अ) अंतर्गत कारवाई

वरोरा, दि. ११जुलै :  नागपूर–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील मागली फाट्याजवळ अपघातग्रस्त अवस्थेत उभ्या असलेल्या एका कारमधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी वाहनाचा चालक व मालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम 65(अ) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात ९ तारीखेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ८ जुलै रोजी रात्री मागली फाट्याजवळ छापा टाकण्यात आला. तेथे एमएच-04-एचआर-4222 क्रमांकाची अपघातग्रस्त हुंडाई व्हेन्यू कार आढळून आली. वाहनाजवळ कोणतीही व्यक्ती उपस्थित नव्हती. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ३७०० नग देशी दारूच्या बाटल्या (९० मि.ली.), १९२ नग विदेशी दारूच्या बाटल्या (१८० मि.ली.) तसेच वाहन असा एकूण ९ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक तपासात संबंधित वाहनातून अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहनाचा चालक व मालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार करीत आहेत. 



Comments