वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई साऊथ झोन-II तायक्वांदो स्पर्धा 2026

वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई साऊथ झोन-II तायक्वांदो स्पर्धा 2026

वरोरा 10/6/2026

वरोरा येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल येथे दिनांक 21 ते 24 जून 2026 दरम्यान सीबीएसई साऊथ झोन-II तायक्वांदो स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.

या चार दिवसीय स्पर्धेत अंडर-14, अंडर-17 आणि अंडर-19 वयोगटातील मुले व मुली सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सीबीएसई पुणे (महाराष्ट्र) विभाग, सीबीएसई बेंगळुरू विभाग आणि सीबीएसई तिरुवनंतपुरम विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांचे संघ सहभाग घेणार आहेत "जवळपास १००० ते १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवणार आहेत."

स्पर्धेचा भव्य उद्घाटन समारंभ 22 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यास विविध मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि पालक उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असून, क्रीडाभावना, शिस्त आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

Comments