वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरातील टाइल्स दुकानातून रातोरात ३ लाखांची धडाकेबाज चोरी, शटर वाकवून आत शिरलेल्या चोरट्यांचा CCTV मध्ये कैद; पोलिसांनी गुन्हा दाखल केला.



वरोरातील टाइल्स दुकानातून रातोरात ३ लाखांची धडाकेबाज चोरी

शटर वाकवून आत शिरलेल्या चोरट्यांचा CCTV मध्ये कैद; पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


वरोरा, दि. 23 (प्रतिनिधी) 
नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बोर्डा परिसरातील  गोविंद मॉलजवळील ‘पटेल टाइल्स अँड ग्रेनाईट’ या दुकानात मंगळवारी पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश केला आणि काउंटरवरील ड्रॉवरमधील अंदाजे तीन लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदार भाविंन रमेश पटेल (वय ३७) यांनी शनिवारी (दि. १८) रात्री ८.३० वाजता दिवसभराची वसुली ड्रॉवरमध्ये ठेवून दुकानाला कुलूप लावले होते. मात्र, रविवारी (दि. १९) सकाळी ६ वाजता दुकानाकडे पाहिले असता शटर वाकवलेले आढळून आले. सदर दुकानात CCTV कॅमेरे बसविले असल्याने तपासणी केली असता, पहाटे २.१० वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम (वय अंदाजे ३० ते ४० वर्षे) शटर वाकवून दुकानात घुसताना दिसून आले.

दुकानदार भाविन पटेल यांनी सांगितले की, "मी सकाळी जिमला जात असताना दुकानाकडे नजर टाकली तेव्हाच हा प्रकार लक्षात आला. आत जाऊन पाहिले असता संपूर्ण रक्कम गायब होती. लगेच पोलिसांना फोन करून माहिती दिली."

वरोरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम ३०५ अ,  ३३१(४),  ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितले की, "CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल." पोलिसांनी दुकानदारासह परिसरातील इतर CCTV फुटेजही ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलीस तपास पथकाने स्थानिक गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेने बोर्डा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, रात्रीच्या वेळी सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी परिसरातील गस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत.
---****---

Comments