वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांचे यश

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांचे यश

चंद्रपूर, दि. १२ : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अखत्यारित असलेले एक महत्वाचे कार्यालय आहे. शालेय स्तरावर विदयार्थ्यांना मराठी विश्वकोशाची ओळख व्हावी व सामान्य ज्ञान मिळावे, याकरीता इयत्ता नववीच्या मराठीच्या पाठयपुस्तकात मराठी विश्वकोशावर आधारित एका पाठाचा समावेश करून मंडळाच्या वतीने इयत्ता नववीमधील विदयार्थ्यांसाठी दरवर्षी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील विश्वभारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विश्वभारती विद्यालयाची ममता कोसारे व सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला तर याच विद्यालयातील वैभव पोहोणकर या विद्यार्थ्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक अजय पवार व सौरव बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट व ३ हजार रुपये रक्कमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, तहसीलदार प्रिया कवळे यांच्यासह शाळेतील शिक्षक अजय पवार, सौरभ बोरकर तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Comments