वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

जिल्ह्याच्या पलीकडे महाराष्ट्रात झळकले वरोऱ्याचे नाव; एक्सलंट अकॅडमीने रचला यशाचा नवा इतिहास! 🚩

जिल्ह्याच्या पलीकडे महाराष्ट्रात झळकले वरोऱ्याचे नाव; एक्सलंट अकॅडमीने रचला यशाचा नवा इतिहास! 🚩


वरोरा : १६ जून २०२२ रोजी आपल्या मातृभूमी वरोरा येथे "एक्सलंट अकॅडमी ऑफ सायन्स"ची मुहूर्तमेढ रोवताना संचालक अभय टोंगे यांनी मोठी स्वप्ने उराशी बाळगली होती. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याची खात्री पटली. अवघ्या आठ दिवसांत हा प्रतिसाद दुप्पट झाला आणि वरोऱ्यातील विद्यार्थ्यांना नागपूरप्रमाणेच दर्जेदार मार्गदर्शन देण्याचा संकल्प अधिक दृढ झाला.
स्थापनेच्या पहिल्याच वर्षी एक्सलंट अकॅडमीने चंद्रपूर जिल्ह्यात घवघवीत यश मिळवले. दुसऱ्या वर्षीही यशाची परंपरा कायम राखत अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण निकालांची मालिका सुरू ठेवली. मात्र यंदाच्या वर्षी अकॅडमीने इतिहास घडवला आहे.
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET PCM) मध्ये एक्सलंट अकॅडमीचा विद्यार्थी मोहक संदीप चवले याने तब्बल १०० पर्सेंटाइल मिळवत राज्यातील अव्वल १२ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. तसेच निशांत संगीत नवघरे याने ९९.९४ पर्सेंटाइल आणि मनन संगीत मोदी याने ९९.१९ पर्सेंटाइल गुण मिळवत जिल्ह्यातील सर्वोच्च यश संपादन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही कोचिंग संस्थेला यापूर्वी अशी कामगिरी करता आली नव्हती. हा मान एक्सलंट अकॅडमी ऑफ सायन्सने मिळवून जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.
वरोऱ्याचे नाव महाराष्ट्रभर झळकावे, हे अभय टोंगे यांचे स्वप्न होते. आज त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. भविष्यात जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अधिकाधिक विद्यार्थी अव्वल स्थान पटकावतील, यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
या यशामागे कुटुंबीय, मित्रपरिवार, पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगत अभय टोंगे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. मात्र हे स्वप्न साकार झाल्याचे पाहण्यासाठी वडील आज हयात नसल्याची खंत त्यांच्या मनात कायम राहणार असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक्सलंट अकॅडमी ऑफ सायन्स भविष्यातही समर्पितपणे कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज राज्यभरातील वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांवर एक्सलंट अकॅडमी व अभय टोंगे यांच्या कार्याची दखल घेतली जात असून, हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व प्रसारमाध्यमे व पत्रकार बांधवांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
"ही केवळ सुरुवात आहे; पुढील काळात आणखी मोठी शिखरे गाठायची आहेत," असा आशावाद व्यक्त करत त्यांनी सर्वांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

वरोरा तालुक्यातील कु. सुरभी विशाल जाजू हिने MHT-CET PCM 2026 परीक्षेत 99.99 परसेंटाईल प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल जाजू निवास येथे नगरपालिकेचे बांधकाम सभापती मनीष जेठांनी यांनी भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
..................................

Comments