वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत उभारणार ‘नमो उद्यान’; विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीतील जागेला मंजुरी.

नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत उभारणार ‘नमो उद्यान’; विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीतील जागेला मंजुरी

वरोरा 19/6/2026
चेतन लूतडे 
वरोरा : महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान निधी अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या ‘नमो उद्यान’ प्रकल्पासाठी वरोरा नगर परिषदेकडून पर्यायी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने शहरातील विविध जागांची पाहणी केल्यानंतर प्रभाग क्रमांक २ मधील मौजा खांजी, सर्व्हे क्रमांक १६९/३ येथील विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसची निवड केली आहे.

यापूर्वी नगर परिषद सर्वसाधारण सभेच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्रमांक १८ नुसार मौजा वरोरा, सर्व्हे क्रमांक १६५ येथील विकास योजनेतील आरक्षित ‘चिल्ड्रन पार्क’ जागेवर नमो उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र संबंधित जागा शासकीय मालकीची असल्याने हस्तांतरण प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी जागा निश्चित करण्याचा निर्णय ३० एप्रिल २०२६ रोजीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ६ अन्वये घेण्यात आला.
यासाठी नगर परिषद अध्यक्षा अर्चना ठाकरे , मुख्याधिकारी सिद्धार्थ मिश्राम, उपाध्यक्ष, गटनेता आणि विरोधी पक्षनेता अशा पाच सदस्यांची समिती गठित करण्यात आली होती. समितीने प्रभाग क्रमांक ३ मधील गजानन नगर तसेच शहरातील इतर उपलब्ध मोकळ्या जागांची पाहणी केली. त्यानंतर प्रभाग क्रमांक २ मधील विद्यानगरी हाऊसिंग सोसायटी परिसरातील ओपन स्पेस नमो उद्यानासाठी सर्वाधिक योग्य असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.
समितीच्या अहवालानुसार, संबंधित जागा उद्यान विकासासाठी आवश्यक निकष पूर्ण करणारी असून पुरेशी जागा उपलब्ध आहे. तसेच नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गालगत दर्शनी भागात असल्याने शहरातील नागरिकांना सहज वापर करता येईल. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणासह विकासालाही चालना मिळेल, असा समितीचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 
प्रभाग क्रमांक दोन मधील नगरसेवकाच्या प्रयत्नाने  नमो उद्यान विकसित होत आहे यासाठी येथील वार्डातील लोकांनी त्यांचे आभार मानले आहे.
त्यामुळे मौजा वरोरा सर्व्हे क्रमांक १६५ येथील आरक्षित चिल्ड्रन पार्कच्या जागेऐवजी मौजा खांजी, सर्व्हे क्रमांक १६९/३, विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये नमो उद्यान विकसित करण्यास समितीने मंजुरी दिली आहे.

बरेच दिवस उलटूनही वरोरा नगरपालिकेसाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रीन झोन बेल्ट मधील जागा कुठे गेल्या असा प्रश्नही पडला आहे. लिज ने दिलेल्या व अतिक्रमित केलेल्या जागा वरोरा नगरपालिकेने वापस घ्याव्यात अशी जनसामान्य लोकांची मागणी आहे.


Comments