वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

भरधाव दुचाकीची ज्येष्ठ महिलेला धडक; गंभीर दुखापतीनंतर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

भरधाव दुचाकीची ज्येष्ठ महिलेला धडक; गंभीर दुखापतीनंतर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.


वरोरा : शहरातील टिळक वॉर्ड परिसरात भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नितीन मधुकर जुमडे (वय 40), रा. गाडगेबाबा नगर, टिळक वॉर्ड, वरोरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आई सिंधु मधुकर जुमडे (वय 61) या दिनांक 11 मे 2026 रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जेवणानंतर घरासमोरील रस्त्यावर फेरफटका मारत होत्या. त्यावेळी हिरो होंडा शाईन (क्रमांक MH-29 CH 4357) ही दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत आलेल्या चालकाने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात सिंधु जुमडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. पुढे सिटी स्कॅन केल्यानंतर अधिक उपचारासाठी नागपूर येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना 23 मे रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतरही काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली राहिल्यानंतर त्या घरी परतल्या.

उपचारानंतर संबंधित वैद्यकीय कागदपत्रांसह वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून दुचाकी चालक आकाश विनोद गंदारे, रा. सरदार पटेल वॉर्ड, वरोरा याच्याविरुद्ध निष्काळजी वाहन चालवून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments