वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मोहरमच्या सवारीदरम्यान काठी लागून शेतकरी जखमी; वरोरा पोलिसांत तक्रार दाखल.बावा वर गुन्हा दाखल.

मोहरमच्या सवारीदरम्यान काठी लागून शेतकरी जखमी; वरोरा पोलिसांत तक्रार दाखल.

बावा वर गुन्हा दाखल.

वरोरा, दि. 26 जून 2026 : वरोरा तालुक्यातील वाघनख येथे मोहरमच्या सवारीदरम्यान निष्काळजीपणे फिरविण्यात आलेल्या काठीमुळे एका शेतकऱ्याला दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी शेतकरी खुशाल बाबाराव घोडे (वय 40 वर्ष) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाघनख येथील रहिवासी खुशाल घोडे हे 21 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8.15 वाजताच्या सुमारास आपल्या आई ललिता बाबाराव घोडे यांच्यासह गावातील जगदीश पांडुरंग कातोरे यांच्या अंगणात सुरू असलेली मोहरमची सवारी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
तक्रारीनुसार, सवारीदरम्यान जगदीश कातोरे यांच्या अंगात सवारी आल्याने त्यांनी हातातील काठी फिरविली. यावेळी खुशाल घोडे हे सवारीच्या जवळ गेले असता ती काठी त्यांच्या पाठीवर तसेच दोन्ही हात व पायावर लागली. या घटनेत त्यांना दुखापत झाली. दुखापतीनंतर त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले असून प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी 23 जून रोजी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार नंदकिशोर रमेश खांके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सवारीदरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप तक्रारदाराने केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Comments