वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

रेल्वे स्टेशन परिसरात मटका जुगारावर पोलिसांची धाड; एकाला अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

रेल्वे स्टेशन परिसरात मटका जुगारावर पोलिसांची धाड; एकाला अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

वरोरा | प्रतिनिधी | दि. 27 जून 2026

वरोरा शहरातील रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेल्या मटका (सट्टा) जुगारावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीला अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, सट्टा चिठ्ठी व इतर साहित्य असा एकूण 1,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस ठाणे वरोरा येथील पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (ब. नं. 2571) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 25 जून 2026 रोजी दुपारी 3.34 ते 4.10 वाजेदरम्यान पोलीस पथक परिसरात पेट्रोलिंग व जुगारविरोधी मोहिम राबवत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशनजवळील ए. जे. डेली नीड्स दुकानासमोर एक व्यक्ती नागरिकांकडून पैसे घेऊन मटका जुगाराची खायवाडी करत आहे.
या माहितीच्या आधारे पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळी अमित अशोकराव घोडमारे (वय 30, रा. मालवीय वॉर्ड, वरोरा) हा मटका जुगार चालविताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून खायवाडीची सट्टा चिठ्ठी, 1,470 रुपये रोख रक्कम आणि एक पेन असा एकूण 1,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments