वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वाढदिवसानिमित्त तीन महिला बचत गटांना १४ लाखांचे कर्जवाटप; जयंतभाऊ टेमुर्डे यांचा सामाजिक उपक्रम

वाढदिवसानिमित्त तीन महिला बचत गटांना १४ लाखांचे कर्जवाटप; जयंतभाऊ टेमुर्डे यांचा सामाजिक उपक्रम


वरोरा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा वरोरा यांच्या वतीने बँकेचे संचालक तथा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष जयंतभाऊ टेमुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तीन महिला बचत गटांना एकूण १४ लाख रुपयांचे कर्ज वितरण करून त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना कर्ज मंजुरीची कागदपत्रे प्रदान करण्यात आली. या कर्जामुळे महिलांना स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यास, लघुउद्योग उभारण्यास तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जयंतभाऊ टेमुर्डे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, बँकेचे अध्यक्ष रवीभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँक दिवसेंदिवस प्रगतीपथावर असून शेतकरी सभासद, महिला बचत गट आणि सर्वसामान्य ग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
तसेच शेतकरी आणि महिला बचत गटांच्या विविध आर्थिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी बँक सदैव तत्पर असून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी जयंतभाऊ टेमुर्डे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

Comments