वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

माजी नगरसेवक दिलीपभाऊ भिवदरे यांचे दुःखद निधन; वरोरा शहरावर शोककळा

माजी नगरसेवक दिलीपभाऊ भिवदरे यांचे दुःखद निधन; वरोरा शहरावर शोककळा

वरोरा, दि. 19 जून :
वरोरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच भाजीपाला व्यापारी म्हणून परिचित असलेले दिलीपभाऊ भिवदरे यांचे शुक्रवार, दि. 19 जून 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वरोरा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
दिलीपभाऊ भिवदरे यांनी नगरसेवक म्हणून कार्य करताना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि जनसंपर्कामुळे त्यांना शहरात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या निधनाने भिवदरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहराने एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गमावले आहेत.

अंत्यविधी शनिवार, दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून, या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भिवदरे परिवाराने केले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!
"माणसं जातात, पण त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी मनात जिवंत राहतात."

Comments