वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

खर्वड येथे किरकोळ वादातून दोघांकडून मजुराला मारहाण; जीवे मारण्याची धमकी, वरोरा पोलिसांत गुन्हा

खर्वड येथे किरकोळ वादातून दोघांकडून मजुराला मारहाण; जीवे मारण्याची धमकी, वरोरा पोलिसांत गुन्हा
वरोरा | दि. 29 जून 2026


तालुक्यातील खर्वड येथे दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी दोघांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश तुळशीदास धात्रक (वय 31, रा. माढेळी, ता. वरोरा) हे मजुरीचे काम करतात. 25 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पैशांची गरज असल्याने ते खर्वड येथे शेतमालकाकडून उसने पैसे घेण्यासाठी गेले होते. पैसे घेऊन बसस्टँड चौकात पानठेल्यासमोर दुचाकी उभी असताना बैलगाडीवरून आलेल्या चरणदास शिरसागर यांच्याशी दुचाकीला बैलगाडी लागू नये, या कारणावरून वाद झाला.
यावेळी चरणदास शिरसागर यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांचा मुलगा प्रफुल्ल शिरसागर तेथे आला. दोघांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच बैलगाडीच्या तुतारीने हाताच्या मनगटावर व पाठीवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
घटनेनंतर फिर्यादीने माढेळी पोलीस चौकी गाठली. तेथून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून प्रफुल्ल चरणदास शिरसागर व चरणदास विठ्ठल शिरसागर, दोघेही रा. खर्वड, यांच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments