वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

खांबाडा येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

खांबाडा येथे अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा : वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने खांबाडा येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणी किसना सुखदेव मानकुमरे (वय 26, रा. खांबाळा, ता. वरोरा) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार सुखराज यादव व सहकारी पोलीस कर्मचारी अवैध दारू विक्री, जुगार व इतर बेकायदेशीर प्रकारांवर कारवाईसाठी परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. खांबाळा येथील एका पानठेल्यावर अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली.
पानठेल्याची झडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या 32 नग रॉकेट देशी दारूच्या 90 एमएलच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 1 हजार 280 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडे दारू साठवणूक व विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
पंचासमक्ष एक बाटली नमुना म्हणून सीलबंद करण्यात आली असून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सपोनि. शरद भस्मे, पो.हवा. सुखराज यादव व पो.शि. मनोज ठाकरे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments