वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात मटका जुगारावर पोलिसांची धाड; किराणा दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोऱ्यात मटका जुगारावर पोलिसांची धाड; किराणा दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा, दि. 27 जून 2026 : वरोरा शहरातील आझाद वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून एका किराणा दुकानदाराला रंगेहात पकडले. आरोपीकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 1,345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 जून 2026 रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून जुगार प्रतिबंधक कारवाईसाठी पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आझाद वॉर्डातील गौरी मसाले अँड किराणा स्टोअर्स दुकानाजवळ एक व्यक्ती मटका जुगारासाठी आकडे लिहून नागरिकांकडून पैसे स्वीकारत असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी तातडीने धाड टाकून संशयिताची झडती घेतली असता तो शरद किसनराव वरघणे (वय 55, रा. आझाद वॉर्ड, वरोरा) असल्याचे निष्पन्न झाले.
झडतीदरम्यान आरोपीकडून मटका जुगाराच्या खायवाडीच्या चिठ्ठ्या, 1,340 रुपये रोख रक्कम आणि एक पेन असा एकूण 1,345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दुपारी 2.53 ते 3.30 या वेळेत करण्यात आली.
याप्रकरणी आरोपी शरद किसनराव वरघणे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments