वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

जीएमआर कंपनी परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जीएमआर कंपनी परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरोरा, दि. 19 जून : वरोरा पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग दरम्यान जीएमआर कंपनी परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या तिघा युवकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक दत्ताहरी जाधव हे पोलीस कर्मचारी दिलीप व केशव यांच्यासह 18 जून रोजी रात्री गस्त घालत असताना जीएमआर कंपनी परिसरात तीन इसम अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरीत्या वावरताना दिसले. पोलिसांनी पंचांना घटनास्थळी बोलावून संबंधित इसमांवर टॉर्चचा प्रकाश टाकताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
चौकशीत त्यांनी आपली नावे सुनिल अर्जुन मंडाळी (वय 30, रा. जामनी, ता. देवळी, जि. वर्धा), ऋतिक रामदास काळे (वय 21, रा. हिंगणघाट, जि. वर्धा) आणि संजय गुलाबराव डोंगरे (वय 35, रा. हिंगणघाट, जि. वर्धा) अशी सांगितली.
रात्री उशिरा जीएमआर कंपनी परिसरात वावरण्याचे कारण विचारले असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ते एखादा हस्तक्षेपनीय गुन्हा करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा करून तिघांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्ताहरी जाधव यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments