वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

माढेळीत मटका जुगारावर पोलिसांची धाड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

माढेळीत मटका जुगारावर पोलिसांची धाड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा 26/6/2026
वरोरा तालुक्यातील माढेळी येथे सट्टापट्टी मटका जुगार चालवित असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरोरा पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार नंदकिशोर रमेश खनके (बकल नं. 07) हे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मडावी यांच्यासह माढेळी पोलीस दूरक्षेत्रात कर्तव्यावर असताना त्यांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, माढेळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील रस्त्यावर प्रकाश पाटील यांच्या पाणठेल्यासमोर एक व्यक्ती लोकांकडून पैसे घेऊन मटक्याचे आकडे लिहून हारजितीचा जुगार खेळवत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाड टाकली. यावेळी काही जुगारी पोलिसांना पाहून पसार झाले. मात्र मटका जुगार चालविणारा इसम पोलिसांच्या ताब्यात आला. चौकशीअंती त्याने आपले नाव देविदास पांडुरंग वादाफळे (वय 49, रा. माढेळी, ता. वरोरा) असे सांगितले.
पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून मटक्याचे आकडे लिहिलेला कागद, एक बॉलपेन आणि सट्टापट्टीतून जमा झालेली 270 रुपये रोख रक्कम असा एकूण 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्तीची कारवाई 22 जून 2026 रोजी करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी देविदास पांडुरंग वादाफळे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments