वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वरोरा–भद्रावती बससेवा सुरू करण्याची ग्रामपंचायत भटाळीची मागणी

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वरोरा–भद्रावती बससेवा सुरू करण्याची ग्रामपंचायत भटाळीची मागणी


भद्रावती, दि. 26 जून 2026 :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायत भटाळीने वरोरा आगार प्रमुखांकडे वरोरा–नंदोरी–भटाळी–डोंगरगाव (खडी)–धानोली–पिर्ती–भद्रावती या मार्गावर शालेय वेळेनुसार एसटी बस सुरू करण्याची मागणी भटाळी येथील सरपंच सुधाकर रोहनकर यांनी  केली आहे.

ग्रामपंचायत भटाळीच्या वतीने 26 जून 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदोरी, भटाळी, डोंगरगाव (खडी), धानोली व पिर्ती या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज वरोरा येथे ये-जा करतात. मात्र, नियमित एसटी बसची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी ऑटो-रिक्षाने प्रवास करावा लागतो. हा खर्च अनेक शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारा नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
ग्रामपंचायतीने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ डोंगरगाव (खडी) येथील सुमारे 50 विद्यार्थ्यांना बससेवेची आवश्यकता आहे. तसेच सर्व गावांतील मिळून 100 हून अधिक विद्यार्थी या मार्गावर प्रवास करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी सकाळी 6.00 ते 11.30 आणि सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 या शालेय वेळेनुसार बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत आमदार करणभाऊ देवतळे (वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ) तसेच विभाग नियंत्रक, चंद्रपूर यांनाही पाठविण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर बससेवा सुरू करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पालकांनी व्यक्त केली आहे.

Comments