वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*सीईटीमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मोहक चवलेचा श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेकडून सत्कार.*श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री परीक्षित एकरे यांच्या हस्ते सत्कार.

*सीईटीमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मोहक चवलेचा श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेकडून सत्कार.

*श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री परीक्षित एकरे यांच्या हस्ते सत्कार.

वरोरा : महाराष्ट्र सीईटी परीक्षेत संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून वरोरा शहराचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या चिरंजीव मोहक संदीप चवले यांचा श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मोहक चवले यांनी महाराष्ट्र सीईटी परीक्षेत राज्यात अव्वल स्थान पटकावून वरोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण शहराचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
सत्कार कार्यक्रमात श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री परीक्षित एकरे, शाखा व्यवस्थापक श्री विलास बोबडे, श्री मिलिंद गोंडे, श्री बेलेकर, श्री विकास पारखी, श्री हरिदास एकरे, श्री ठेंगणे तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मोहक यांचे वडील श्री संदीप चवले, आई तसेच आजी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी मोहकच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मोहक चवले यांच्या या उल्लेखनीय यशामुळे वरोरा शहराचा नावलौकिक राज्यभर उंचावला असून त्यांच्या यशाचा सर्व स्तरातून गौरव केला जात आहे.

Comments