वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

‘जय माणिका’ आदिवासी विद्यार्थी संघटनेचे व्यक्तिमत्व विकास शिबीर वरोरा येथे यशस्वी

‘जय माणिका’ आदिवासी विद्यार्थी संघटनेचे व्यक्तिमत्व विकास शिबीर वरोरा येथे यशस्वी

वरोरा (जि. चंद्रपूर) : आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना, विदर्भ (जिल्हा चंद्रपूर, तालुका शाखा-वरोरा) तर्फे आयोजित स्पर्धापरीक्षा व व्यक्तिमत्व विकास शिबीर सालोरी येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. वेळेअभावी रोजनिशी व आभार वेळेत न मांडल्याबद्दल आयोजकांनी प्रतिनिधींची क्षमा मागितली.

या शिबिराचे मार्गदर्शन प्रा. सुहानंद भाऊ ढोक यांनी दिले. शिबिरासाठी सालोरी गावातील अनिकेत रमेश जीवतोडे, अतुल नागोजी नन्नावरे, गणेश देवानंद ठाकरे, पंजाब शामराव ढोक, पियुष कवडू वाघ, अजय मोरेश्वर जीवतोडे, शुभम मगरे, किशोर बडू ढोक, निखिल नलेश जीवतोडे, संकेत सुनील चौधरी या युवकांनी अनाज व आर्थिक सहकार्य करत मोलाची साथ दिली. याशिवाय निखिल राणे (सुसा), अमित घोडमारे (धुमनखेडा), अंकित दडमल (उसेगाव), रोशन हजारे (खेमजई) यांनीही आपली कामे बाजूला ठेवून शिबिराची धुरा सांभाळली.

उष्णता लक्षात घेता प्रफुल अरुणजी भरडे (मोवाडा) यांनी तीन कुलर व डेकोरेशन साहित्य मोफत उपलब्ध करून दिले. गावातील सौ. पल्लविताई कुलदीप श्रीरामे व सौ. सुमनताई पुंडलिक श्रीरामे यांनी उत्तम जेवणाची सोय केली. सरस्वती विद्यालय, सालोरी व मुधोली येथील परिचारक अरुण वाकडे, गणपत तुमसरे, भैया ढोक, अरुण सावसाकडे, सूर्यप्रकाश बावणे यांनी शिबिरासाठी मनुष्यबळ व सुविधा पुरविल्या. श्री सुरेशजी श्रीरामे व श्री अजाबरावजी नन्नावरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिरातील सर्वाधिक जिज्ञासू उपस्थिती म्हणून स्नेहा घरत (खडसंगी) यांचा गौरव करण्यात आला. संघटनेचे सल्लागार हरिदासजी श्रीरामे (WCL चंद्रपूर) यांनी आर्थिक सहकार्य करत शिबिराला सातत्याने पाठिंबा दिला. खर्चाचे अर्धे हिस्सेदार रवींद्रजी काळमेघे (वरोरा) यांचे योगदान प्रेरणादायी ठरले. ग्राम शाखा भटाळा, सालोरी, आष्टा व मॅजिक परिवार पुयारदंड यांनी अनाजाची मदत केली. सर्व समाजबांधव व सालोरी ग्रामस्थांचे आभार आयोजक कुलदीप श्रीरामे यांनी मानले. पुढील शिबिरासाठी सूचना त्यांच्या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहनही केले.

Comments