वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अरुण लखानी यांचे वरोऱ्यात जल्लोषात स्वागत; करण देवतळे यांच्या निवासस्थानी सत्कार

नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अरुण लखानी यांचे वरोऱ्यात जल्लोषात स्वागत; करण देवतळे यांच्या निवासस्थानी सत्कार

वरोरा- चेतन लूतडे -10/6/2026

वरोरा : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद सदस्य म्हणून निवड झालेल्या आमदार अरुण लखानी यांचे वरोरा शहरात आगमन झाले असता त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजयजी देवतळे यांच्या निवासस्थानी विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी आमदार करण देवतळे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार अरुण लखानी यांचे स्वागत केले तसेच विधान परिषद निवडणुकीतील त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही त्यांचा सत्कार करून त्यांच्या निवडीमुळे विदर्भातील विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे, उपेंद्रजी कोठेकर, डॉ. सागर वझे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आमदार अरुण लखानी यांच्याशी संवाद साधत विविध विकासकामांबाबत चर्चा केली.
यावेळी आमदार अरुण लखानी यांनी उपस्थितांचे आभार मानत वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार अरुण लखानी यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.

Comments