वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मोहबाळा रोड परिसरातून हिरो स्प्लेंडर दुचाकी चोरी; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

मोहबाळा रोड परिसरातून हिरो स्प्लेंडर दुचाकी चोरी; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

वरोरा, दि. 23 जून : शहरातील मोहबाळा रोड परिसरातून घरासमोर उभी केलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव रंजीत बऱ्हाणपुरे (वय 27) रा. वरोरा,मोहबाळा रोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची हिरो स्प्लेंडर (क्रमांक MH-34-CB-2312) ही मोटारसायकल 13 मे 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी 14 मे रोजी सकाळी सहा वाजता उठून पाहिले असता मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही.
तक्रारदाराने परिसरात शोध घेतला असता वाहनाचा कोणताही तपास लागला नाही. चोरीस गेलेली दुचाकी काळ्या रंगाची असून तिची अंदाजे किंमत 40 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, तक्रारदाराचे वडील गंभीर आजारी असल्याने त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तळेवार पुढील तपास करीत आहेत.

Comments