वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

जमिनीच्या वाटणीच्या वादातून कुटुंबीयांमध्ये हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जमिनीच्या वाटणीच्या वादातून कुटुंबीयांमध्ये हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा, दि. 7 जून 2026 :

जमिनीची मोजणी व कौटुंबिक मालमत्तेच्या वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दाम्पत्याला काठ्यांनी मारहाण केल्याची घटना दोन तारखेला सकाळी दहाच्या सुमारास नंदोरी येथे घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदोरी येथील माधुरी विजय ठावरी (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांच्या पतीने जमिनीची मोजणी करून गट क्रमांक वेगळे करण्याबाबत तसेच कौटुंबिक दागिन्यांची वाटणी करण्याबाबत चर्चा केली असता वाद निर्माण झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपींनी काठ्यांच्या साहाय्याने तक्रारदारांच्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या पतीला पाय, पाठ व कमरेला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचार सुरू आहेत. तक्रारदार महिलेलाही मारहाण करण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपी राजू नानाजी ठावरी, सुनीता राजू ठावरी आणि प्रथम राजू ठावरी यांच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments