वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात ‘नमो उद्यान’चे भूमिपूजन; विज्ञानगरी परिसराला मिळणार हरित विकासाची नवी ओळख.

वरोऱ्यात ‘नमो उद्यान’चे भूमिपूजन; विज्ञानगरी परिसराला मिळणार हरित विकासाची नवी ओळख.

वरोरा -चेतन लूतडे 26/6/2026

                            जाहिरात
विशेष अनुदान निधी २०२५-२६ अंतर्गत नगर परिषद वरोरा हद्दीतील मौजा खांजी, सर्व्हे क्र. १६९/३ येथील विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या ‘नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या विकासकामाचा शुभारंभ वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणभाऊ देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर  उपस्थित होत्या. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन कार्यक्रमाचा श्री गणेशा करण्यात आला.
या प्रसंगी नगर परिषद वरोराच्या नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई ठाकरे, उपाध्यक्ष सौ. योगिताताई नेरकर, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नगरसेवक बंडुभाऊ देऊळकर, नगरसेविका सौ. वर्षाताई पिसाळ, तसेच ज्येष्ठ नगरसेवक गजानन मेश्राम, माजी नगराध्यक्ष विलासभाऊ टिपले, नगरसेवक प्रदीपजी बुऱ्हाण, नगरसेवक अनिलजी झोटिंग, नगरसेवक संतोषजी पवार, नगरसेवक अक्षय भिवदरे, नगरसेवक शंभूनाथजी वरघणे, मंगेशजी पिसाळ , राजू जाजूर्ले, नगरसेवक राहुल देवळे  यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साकारण्यात येणारे हे ‘नमो उद्यान’ लहान मुलांसाठी खेळण्याची सुरक्षित जागा, युवकांसाठी व्यायामाची सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्याचा रमणीय परिसर आणि पर्यावरण संवर्धनासाठी हरित क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. भविष्यात हे उद्यान सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांचेही महत्त्वाचे केंद्र ठरेल.
विज्ञाननगरी परिसरातील नागरिकांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या परिसराला अखेर विकासाची नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच सर्व वयोगटातील नागरिकांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी नगर परिषद वरोरा प्रशासनाने शहरातील मूलभूत सुविधा, हरित क्षेत्रांची निर्मिती आणि नागरिकांच्या जीवनमानात सातत्याने सुधारणा करण्यासाठी विकासकामांची गती कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने ‘नमो उद्यान’ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
.........................

Comments