वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोऱ्यात सवारीदरम्यान तरुणावर लोखंडी वस्तूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


वरोऱ्यात सवारीदरम्यान तरुणावर लोखंडी वस्तूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा (प्रतिनिधी): वरोरा शहरातील सवारी उत्सवादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका 23 वर्षीय तरुणाला लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना 26 जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास सुभाष वॉर्ड परिसरात घडली.
फिर्यादी हिमांशु दिलीप घोरपडे (वय 23, रा. सिद्धार्थ वॉर्ड, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मित्र साहील जाधव याच्यासोबत सवारी पाहण्यासाठी गेले होते. यावेळी साहील जाधव याचा कैफ शेख याच्याशी धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर कैफ शेख व त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी साहील जाधवचा पाठलाग करत सुभाष वॉर्डातील वाय पॉईंट येथे गाठले.
वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हिमांशु घोरपडे यांच्या डाव्या डोळ्यावरील कपाळावर कैफ शेख याने लोखंडी वस्तूने वार करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या आरीष पटेल, रेहान शेख व विक्की खिरळकर यांनीही हाताबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेत साहील जाधव व विजय राम यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जखमी हिमांशु घोरपडे यांना त्यांचे मित्र साहील जाधव व चुलत भाऊ कौशिक घोरपडे यांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल केले.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात कैफ शेख, आरीष पटेल, रेहान शेख व विक्की खिरळकर यांच्याविरुद्ध फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1) व 3(5) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास वरोरा  पोलीस करीत आहे.

Comments