वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नागरी येथे हातभट्टी मोहादारूवर पोलिसांची कारवाई; ३,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागरी येथे हातभट्टी मोहादारूवर पोलिसांची कारवाई; ३,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरोरा : अवैध दारू विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान वरोरा पोलिसांनी नागरी गावात धाड टाकून हातभट्टी मोहादारू जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस अंमलदार विशाल अरुण राजुरकर हे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, नागरी येथील भारत नारायण डोंगरे (वय ६०) हे आपल्या घरासमोर अवैधरित्या हातभट्टी मोहादारू विक्रीसाठी साठवून ठेवत आहेत.

माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांना सोबत घेत नागरी येथे धाड टाकली. यावेळी भारत डोंगरे यांच्या घरासमोर तपासणी केली असता एका प्लास्टिक कॅनमध्ये ५ लिटर हातभट्टी मोहादारू तसेच एका प्लास्टिक बाटलीत १ लिटर हातभट्टी मोहादारू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत ३ हजार ६०० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी नमुना म्हणून दारूची शिशी सीए परीक्षणासाठी सीलबंद केली. आरोपीकडे दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

या प्रकरणी भारत नारायण डोंगरे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments