वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

ट्रॅव्हल्स चालक व पिकअप चालकामध्ये राडा; लोखंडी रॉडने हल्ल्याचा परस्पर आरोप.

ट्रॅव्हल्स चालक व पिकअप चालकामध्ये राडा; लोखंडी रॉडने हल्ल्याचा परस्पर आरोप.

वरोरा : चंद्रपूर-वरोरा मार्गावरील कोंढा फाटा व नंदोरी परिसरात ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहन चालकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रारी दिल्या असून घटनेची चौकशी सुरू आहे.

पिकअप चालक नरेंद्र गुलाबराव गावडे (वय 45, रा. आनंदवन चौक, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांच्या पिकअप वाहनाने वरोऱ्याकडे येत असताना कोंढा फाट्याजवळ मागून आलेल्या डीएनआर ट्रॅव्हल्सच्या वाहनाने त्यांच्या वाहनाला कट मारून दाबल्याने अपघात होण्याची वेळ आली होती.

तक्रारीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स चालकाने वाहन थांबवून गावडे यांना खाली ओढून मारहाण केली. त्यानंतर नंदोरी येथे दोन्ही वाहनचालक पुन्हा समोरासमोर आले असता वाद वाढला. यावेळी ट्रॅव्हल्स चालकासोबत असलेल्या अन्य व्यक्तींच्या मदतीने लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे.

या मारहाणीत डोक्याला व डोळ्याजवळ दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत त्यांच्यावर वरोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, याच घटनेबाबत ट्रॅव्हल्स चालकानेही पिकअप चालकाविरुद्ध वाहनाची काच फोडणे व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप करण्यात आले असून वरोरा पोलीस सर्व बाबींची तपासणी करीत आहेत.



Comments