वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नागरी येथे मटका जुगारावर पोलिसांची धाड; पानठेला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

नागरी येथे मटका जुगारावर पोलिसांची धाड; पानठेला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोरा, दि. 24 जून 2026 : वरोरा पोलीस स्टेशनअंतर्गत माढेळी पोलीस दुरक्षेत्राच्या पथकाने नागरी येथे मटका जुगारावर धाड टाकून एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत राजेश शंकर वाटमोळे (वय 42), व्यवसाय – पानठेला, रा. नागरी, ता. वरोरा याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार नंदकिशोर रमेश खनके व पोलीस अंमलदार रोशन तामसेटवार हे दि. 24 जून रोजी माढेळी पोलीस दुरक्षेत्रात पेट्रोलिंग व जुगारविरोधी कारवाई करीत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, नागरी येथील संजय आक्सर यांच्या पानठेल्यासमोर मिलन ओपन मटक्याच्या आकड्यांवर पैशांची बाजी स्वीकारून सट्टापट्टीचा जुगार सुरू आहे.
या माहितीच्या आधारे पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र राजेश शंकर वाटमोळे हा जागेवर मिळून आला.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडून मटका जुगारातील 430 रुपये रोख, एक बॉलपेन तसेच आकडे लिहिलेली सट्टापट्टीची चिठ्ठी असा एकूण 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई दुपारी 2.10 ते 2.50 या वेळेत करण्यात आली. याप्रकरणी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments