वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

म्हशी चारण्याच्या वादातून तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा

 म्हशी चारण्याच्या वादातून तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा

वरोरा : म्हशी चारण्याच्या जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना पावना येथे घडली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावना येथील विशाल मोहन घागी (वय 30) हे शेतीसोबत म्हशी चारण्याचे काम करतात. गावातील अनिल घागी, त्यांचा मुलगा वैभव घागी आणि बंडू घागी यांच्यासोबत म्हशी चारण्याच्या जागेवरून यापूर्वीही अनेकदा शाब्दिक वाद झाले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये बोलचाल बंद होती.
2 जून रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास विशाल घागी हे गावातील पानठेल्याकडे जात असताना गजानन शेंडे यांच्या घराजवळ चंद्रशेखर झाडे यांच्याशी बोलत उभे होते. त्यावेळी म्हशी चारण्याच्या जागेबाबत चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला.
तक्रारीनुसार, बंडू घागी याने जवळील बंडीची उभारी काढून विशाल घागी यांच्या डोक्यावर मारल्याने त्यांना दुखापत झाली व रक्तस्राव झाला. तसेच वैभव घागी याने शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या विशाल यांच्या आई सुमन घागी यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या हातातील बांगड्या फुटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जखमी विशाल घागी यांनी प्रथम वरोरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे वैभव अनिल घागी व बंडू अनिल घागी यांच्याविरुद्ध  गुन्हा नोंदवून पुढील तपास वरोरा पोलिसांनी सुरू केला आहे.

Comments

  1. संबंधित माहिती publish करण्याअगोदर तुम्ही माहिती घेतली होती का. विशाल घागी हा तरुण अनिल दारूच्या नशेत बेधुंद होऊन अनिल घागी यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करत होता अनेकांनी त्याला घरी नेऊन सोडले पण तो वारंवार अनिल घागी आणि त्यांच्या मुलावर प्राणघातकी हल्ला आणि शिवीगाळ करत होता. अनिल घागी यांच्या मुलानी विशाल घागी ला काठीने मारले.मग स्वरक्षणासाठी शस्त्र उचलणे गुन्हा असेल तर होय त्यांनी गुन्हा केला स्वतःच्या रक्षणासाठी आणि घागी यांनी फक्त पोलिस तक्रार करण्यासाठी स्वतःच्या हाताने बांगड्या फोडल्या.


    तुम्हाला जर खरी बातमी माहिती नसेल खोटी बातमी पसरवू नये. Ground लेवल ला जाऊन थोडा विचारपूस करा कधी.

    ReplyDelete

Post a Comment