वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

खांबाडा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

खांबाडा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा, दि. 26 जून 2026 : वरोरा पोलिसांनी खांबाडा येथे अवैधरित्या देशी दारूची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका युवकाविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार विक्की सदाशिवराव करपे (ब. नं. 732) हे सहकारी पोलीस कर्मचारी व जवानांसह खांबाडा बसस्टॉप परिसरात रोड बंदोबस्ताची ड्युटी पूर्ण करून परत येत असताना त्यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. खांबाडा येथील अनिकेष अरविंद मेश्राम (वय 26 वर्षे) हा आपल्या प्लॉटवरील बंड्यात अवैधरित्या दारू साठवून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. अनिकेष मेश्राम याची ओळख पटवून त्याच्या बंड्याची कायदेशीर झडती घेतली असता एका खाकी रंगाच्या खोक्यात रॉकेट संत्रा कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या 60 सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत 2 हजार 400 रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दारूबाबत परवाना विचारला असता संबंधित युवकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एक बाटली नमुना (सी.ए. सॅम्पल) म्हणून सीलबंद करून ठेवण्यात आली.
सदर पंचनामा दुपारी 3.15 ते 4.00 वाजेदरम्यान करण्यात आला. या प्रकरणी आरोपी अनिकेष अरविंद मेश्राम याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments