वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नंदोरी जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात.

नंदोरी जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात.

नंदोरी शाळेची सुरुवात मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. 

नंदोरी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळा, नांदोरी येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत  करण्यात आले. फुगे, पुष्पगुच्छ आणि आनंदी वातावरणात झालेल्या या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी उपस्थित चंद्रपूर येथील मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. "शाळा ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची आणि संस्कारांची पहिली पायरी आहे," असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाला सहसरपंच श्री. मंगेश भोयर, माजी सभापती श्री. धनराजजी विरुडकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. नरेंद्र जीवतोड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. घनश्यामजी ढवस, गुरुदेव सेवा मंडळाचे श्री. तुळशीरामजी लांबट, माजी सरपंच श्री. शरदजी खामणकर, श्री. सचिन अवचट, श्री. सचिन येवले तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. फगुभाऊ वाढई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय सातपुते, श्री. पंडित डोहे, कु. विजया भोमले, सौ. भाग्यश्री कामडी आणि सौ. माधुरी चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थितांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, "शिक्षण हेच प्रगतीचे मूळ आहे. या शाळेतून भविष्यात आदर्श नागरिक आणि देशसेवक घडावेत," अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments